नेटवर्किंग डिव्हायसेस

 

नेटवर्कचे प्रकार कोणते ते आपण मागच्या लेखात पाहिले.

LAN , MAN , WAN हे प्रकार नेटवर्क किती जागेमध्ये तयार केले आहे त्यावरून आले आहेत. नेटवर्कमध्ये संदेशवहनासाठी कोणते माध्यम वापरले आहे त्यावरून नेटवर्कचे वर्गीकरण केले जाते.

. इथरनेट नेटवर्क यामध्ये कॉपर केबल वापरून नेटवर्क केले जाते. यात इलेक्ट्रीसिटी सिग्नलच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

. वायरलेस नेटवर्क यामध्ये रेडिओतरंगाच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

. फायबर ऑप्टिक नेटवर्क यामध्ये फायबर ऑप्टिक केबल वापरून नेटवर्क केले जाते . यामध्ये प्रकाशलहरींच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

कोणत्याही ठिकाणी नेटवर्क तयार करण्यासाठी गरज असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची ज्याला नेटवर्किंग डिव्हायसेस असे म्हंटले जाते. नेटवर्किंग डिव्हायसेस कोणती , त्यांचे प्रकार , उपयोग यांची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.

. नेटवर्क कार्ड आपला संगणक नेटवर्कला जोडण्यासाठी याचा उपयोग होतो. यालाच LAN card , LAN adapter अशी वेगवेगळी नावे आहेत . नेटवर्क कार्ड वेगवेगळ्या प्रकारची असतात जसे की इथरनेट’ LAN कार्ड , वायरलेस LAN कार्ड , फायबर ऑप्टिक कार्ड इ.आपण कोणत्या प्रकारचे माध्यम वापरणार आहोत त्यावर कोणते कार्ड वापरायचे हे अवलंबून आहे.

. नेटवर्क केबल कॉपर केबल आणि फायबर ऑप्टिक केबल हे यात मुख्य प्रकार असून कॉपर केबलच्या जाडीवरून UTP , STP, co-axial असे वेगवेगळे उपप्रकार आहेत. यापैकी UTP या प्रकारची cat 5 किंवा cat 6 ही केबल इथरनेट LAN मध्ये वापरली जाते.

. रीपीटर कॉपर केबल वापरून जेव्हा संदेशवहन केले जाते तेव्हा त्यामध्ये असणार्‍या resistance मुळे हा संदेश विशिष्ट अंतर पार करून गेल्यावर कमजोर होतो व त्यामुळे destination ला संदेश योग्य रितीने मिळत नाही. त्यासाठी रीपीटर हे उपकरण सिग्नलची stength वाढवायला मदत करते.

. हब ,ब्रिज दोनपेक्षा जास्त संगणक जोडण्यासाठी पूर्वी हे उपकरण वापरले जायचे. पण यामार्फत होणार्‍या संदेशवहनाचा वेग खूपच कमी म्हणजे ४ ते १६ Mbps इतका असतो.

.  स्वीच दोनपेक्षा जास्त संगणक जोडण्यासाठी हे उपकरण सध्या वापरतात. यामध्ये ८ पोर्ट, १६ पोर्ट , १२० पोर्ट असे बरेच प्रकार आहेत.यामुळे आपल्याला १०० ते १००० Mbps इतका वेग संदेशवनासाठी मिळू शकतो. तसेच Configurable switch वापरून आपण Virtual LAN तयार करू शकतो.

. राऊटर दोन किंवा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्कमध्ये संदेशवहन करण्यासाठी राऊटर वापरणे गरजेचे आहे. सिस्को, ज्युनिपर, सॅमसंग यासारख्या कंपन्या राऊटर तयार करतात.

. अ‍ॅक्सेस पॉइंट इथरनेट नेटवर्क आणि वायरलेस नेटवर्क यांना एकत्र जोडण्यासाठी हे उपकरण वापरतात.

कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची नेटवर्किंग डिव्हायसेस वापरावी लागतील हे आपण कोणत्या प्रकारचे नेटवर्क तयार करणार आहोत यावर अवलंबून आहे. उदा. जर आपल्याला इथरनेटया प्रकारचे LAN तयार करायचे असेल तर UTP या प्रकारची केबल , ‘इथरनेट’ LAN कार्ड , स्वीच असे डिव्हायसेस वापरावे लागतात , तर वायरलेसया प्रकारचे LAN तयार करण्यासाठी वायरलेस LAN कार्ड , अ‍ॅक्सेस पॉईंट असे डिव्हायसेस वापरावे लागतात . थोडक्यात आपल्या गरजेनुसार कोणत्या प्रकारचे LAN तयार करायचे आहे ते ठरवून प्रथम त्याचा लेआऊट काढून घ्यावा लागतो. नंतर डिव्हायसेसच्या गरजेनुसार त्यांची जागा ठरवून घ्यावी लागते. आणि नंतर LAN चा सेटअप तयार करावा लागतो.

सर्व images गुगलकडून साभार

सर्व images गुगलकडून साभार

 

कॉम्प्युटर नेटवर्क….ओळख आणि माहिती

आपल्या रोजच्या जीवनात आपण ‘नेटवर्क’ हा शब्द बर्‍याचदा ऎकतो. कळत न कळत आपण कुठल्या ना कुठल्या नेटवर्क सेवेचा लाभ घेत असतो. उदा. केबल टीव्ही, बँकांचे जाळे इ. माहितीच्या नेटवर्कच्या आधारे काही नेटवर्क्‍स विकसित झाली आहेत. त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात माहिती मिळविण्यासाठी करतो. ज्यामध्ये इंटरनेट, रेल्वे आरक्षण, ग्रंथालय नेटवर्क व माहितीचे नेटवर्क या दळणवळणातील प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा समावेश होतो. इंटरनेट म्हणजे माहितीचे प्रचंड मोठे जाळे , बर्‍याच सारे नेटवर्क येथे एकत्रित केले असतात. पण हे नेटवर्क काय आहे ? याची सुरवात कधी , कुठे , कशी झाली ? कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? नेटवर्कचे फायदे-तोटे काय आहेत? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नेटवर्किंगमध्ये नवीन तंत्रज्ञान कोणते आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून मिळवणार आहोत.

१९७०च्या दशकात पी.सी अर्थात पर्सनल कॉम्प्युटर अर्थात खाजगी उपयोगासाठीचा संगणक वापरायला सुरवात झाली. स्वत:च्या संगणकावर महत्वाची माहिती साठवली जाऊ लागली. एक्सेल शीटवर बिलींग करणे , शाळा अथवा कॉलेजचे निकालपत्र तयार करणे इ. कामे केली जाऊ लागली. यातूनच ही सर्व माहिती शेअर करण्याची गरज निर्माण झाली. आणि जन्म झाला ‘नेटवर्क’ या तंत्रज्ञानाचा!!! नेटवर्क म्हणजे एकाच प्रकारे काम करणारे, एकत्रित प्रणाली व पद्धतीमध्ये भाग घेणारे दोन घटक दळणवळण माध्यमाने जोडणे होय. नेटवर्कचा मुख्य उद्देश हा आहे की एका प्रकारचे काम हे नेटवर्क घटकांच्या मदतीने द्विगुणित करणे.

यू.एस. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने (DoD) १९६० साली स्थापन केलेले कॉम्प्युटर नेटवर्क हे पहिले नेटवर्क होय. त्यास ‘अर्‌पानेट’ म्हटले गेले. या नेटवर्कमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संगणकांमध्ये संवाद होऊ शकतो हे सिद्ध झाले. अर्‌पानेटचे रूपांतर आज जगप्रसिद्ध इंटरनेट या महाकाय नेटवर्कच्या जाळ्यात रूपांतरित झाले आहे.

कॉम्प्युटर नेटवर्क हे किती जागेमध्ये , कसे तयार केले आहे यावरून त्याचे ३ प्रकार पडतात.

१.  लोकल एरिया नेटवर्क (LAN) – हे एका छोट्या कंपनीत , शाळा / कॉलेजमध्ये किंवा घरगुती उपयोगासाठी केले जाते. यामध्ये कमीत कमी २ ते जास्तीत जास्त १०० कॉम्प्युटर जोडलेले असतात. एका मर्यादित उद्देशासाठी या प्रकारचे नेटवर्क हे अत्यंत उपयुक्त आहे. पण यामध्ये जर जागेची व्याप्त्ती किंवा जोडलेल्या कॉम्प्युटर संख्या वाढली तर नेटवर्कचा स्पीड कमी होतो. अर्थात नेटवर्कचा स्पीड हा इतरही बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो.

२.  मेट्रोपोलिटॅन एरिया नेटवर्क (MAN) – याप्रकारचे नेटवर्क हे एखाद्या शहरापुरते , राज्यापुरते मर्यादित असते. उदा. केबल नेटवर्क

३. वाईड एरिया नेटवर्क (WAN) – हे सर्वात मोठे नेटवर्क, जे शहर, राज्य , देश यांच्या हद्दी ओलांडून जाते. यामध्ये बरेच LAN अथवा MAN एकत्र जोडलेले असतात. याचे सर्वात महत्वाचे , मोठे उदाहरण म्हणजे ‘इंटरनेट’.

नेटवर्कमध्ये communication साठी कोणते माध्यम वापरले आहे त्यावरून नेटवर्कचे वर्गीकरण केले जाते.

१. इथरनेट नेटवर्क – यामध्ये कॉपर केबल वापरून नेटवर्क केले जाते. यात इलेक्ट्रीसिटी सिग्नलच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

२. वायरलेस नेटवर्क – यामध्ये रेडिओतरंगाच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

३. फायबर ऑप्टिक नेटवर्क – यामध्ये फायबर ऑप्टिक केबल वापरून नेटवर्क केले जाते . यामध्ये प्रकाशलहरींच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते. या प्रकारचे माध्यम वापरून आपण सर्वात जास्त सुरक्षित , वेगवान आणि जास्तीत जास्त अंतरापर्यंत संदेशवहन करू शकतो.

नेटवर्कमध्ये communication चा वेग हा किलोबाईटस्‌ पर सेकंद (KBPS) , मेगाबाईटस्‌ (MBPS) किंवा गिगाबाईटस्‌ (GBPS) असा मोजला जातो. १००० बाईटस्‌ म्हणजे १ किलोबाईट आणि १००० किलोबाईट म्हणजे १ मेगाबाईट आणि १००० मेगाबाईट म्हणजे १ गिगाबाईट असे हे परिमाण आहे. वेगवेगळ्या प्रकारची नेटवर्क तयार करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे म्हणजे नेटवर्क डिव्हायसेस लागतात. जसे की इथरनेट केबल , नेटवर्क कार्ड , हब , स्वीच , राऊटर , गेटवेज्‌ इत्यादी. नेटवर्कचा मूळ उद्देश आहे – कम्युनिकेशन ! अर्थात दोन अथवा जास्त संगणकांमधला संवाद. हा संवाद करण्यासाठी एका विशिष्ठ प्रणालीची गरज असते. यामध्ये संवादासाठीच्या नियमांचा (प्रोटोकॉल्सचा) समावेश होतो. TCP/IP , Novell Netware , Appletalk असे बरेच प्रोटोकॉल्स वापरून दोन अथवा जास्त संगणकांमध्ये माहितीचे वहन केले जाते.

कॉम्प्युटर नेटवर्क हे कामाचा ताण विभागण्यासाठीसुध्दा उपयुक्त आहे. यामध्ये ‘क्लायंट-सर्व्हर’ हे तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानात सर्व माहिती (database) हा सर्व्हरवर साठवलेला असतो. क्लायंट त्याच्या गरजेनुसार हा माहितीचा साठा वापरू शकतो. तसेच सर्व्हरला प्रिंटर जोडलेला असेल तर क्लायंट त्या प्रिंटरवरून प्रिंटस्‌ काढू शकतो. यासाठी ‘क्लायंट-सर्व्हर’ तंत्रज्ञानात बरीच सेटींग्ज करावी लागतात. कोणाही अनाहूत कॉम्प्युटरद्वारे सर्व्हरला कनेक्ट करून त्यावरील माहितीचा दुरूपयोग करू नये म्हणून त्याला वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा (security) द्यावी लागते.

ता.क- माझा हा  लेख ’डेटाकॉम’ या कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञान विषयक मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे.