मन सुद्द तुजं……..

 
लहान मुले आपल्याला कळत नकळत बरेच काही शिकवून जात असतात. त्याचाच अनुभव काल आला.

श्रृतीनं काल तिचा डबा शाळेत संपवला नव्हता, परवा दिवशी पण थोडा डबा शिल्लक होता. म्हणून मी तिला म्हंटले “काय ग श्रृती, टिफीन फास्ट फास्ट फिनिश करायचा नाही कां ? तुझा टिफीन शिल्लक कसा काय राहतो?” यावर तिनं जे काही उत्तर दिलं ते तिच्याच भाषेत सांगते. “अगं आई, ती सार्या आहे नां, माझी फ्रेंड, तिला शू आली होती टिफीन रिसेस मध्ये, मग मला तिला टॉयलेट्पर्यंत सोडायला जावं लागलं . मग मी परत आल्यावर फास्ट फास्ट टिफीन खाल्ला पण थोडा राहिला.” मी पूर्णपणे गोंधळात पडले. मनात विचार केला की ही सार्या एकटी कां नाही टॉयलेट्ला गेली? मी तसं श्रृतीला विचारलं. तर ती म्हणाली, “अगं आई, सार्या नां छोटी आहे.” “म्हणजे? ती तुझ्याच क्लासमध्ये आहे नां?”. “हो गं, पण तिचे पाय छोटे आहेत, मग तिला स्टेप्सवर चढताना दोन्हीकडून धरावं लागतं. मग मी आणि रिद्धी तिला घेऊन टॉयलेट्ला गेलो”. मला लक्षात आलं की, तिच्या मैत्रिणीच्या पायात काही दोष असणार आहे. तिला जिना चढता येत नाही. या सगळ्याजणी टिफीन खायला ग्राउंडवर जातात. सार्याला सोडण्यासाठी श्रृती आणि तिची मैत्रिण रिद्धी पहिल्या मजल्यावरच्या ज्युनिअरसाठीच्या टॉयलेट्पर्यंत गेल्या होत्या. (तिथे मावशी असतात मदत करायला.) मला श्रृतीचं इतकं कौतुक वाटलं !!!. आपला टिफीन तसाच अर्धवट सोडून ती मैत्रिणीला मदत करायला गेली होती. मग मी तिला मुद्दाम विचारले, “तुला टीचरनी तिची मदत करायला सांगितली होती कां?”, “नाही गं, मला तिची हेल्प करायला आवडतं, ती माझी फ्रेंड आहे नां!!”. मला खूप भरून आलं. मी तिला फक्त एवढंच म्हणू शकले, “व्हेरी गुड, माय बच्चा. अशीच सगळयांना मदत करत जा”.

जराही कुरकुर, तक्रार न करता, कोणताही ‘मी हे केलं’ असा गर्व न ठेवता, कुणीही न सांगता श्रृतीनं आपणहून मदत केली. मला खरंच तिचा खूप खूप अभिमान वाटला.

Advertisements

14 comments on “मन सुद्द तुजं……..

 1. sahajach म्हणतो आहे:

  श्रृती तुझं खरचं मनापासून कौतूक बेटा… 🙂

  तुझ्या आईला आहेच पण आम्हा सगळ्या मावश्यांनाही तूझा अभिमान वाटतोय!!

 2. kajal म्हणतो आहे:

  very good shruti, keep it up

 3. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  श्रुती, ह्या देवेनमामालाही तुझा अभिमान वाटतो आहे …अशीच राहा ..

 4. श्रेया म्हणतो आहे:

  आपण मोठी माणसंच आपपरभाव बाळगतो. लहान मुलं खरंच निरपेक्ष मदत करत असतात.

 5. सौरभ म्हणतो आहे:

  🙂 🙂 god bless Shurti 🙂

 6. सुहास म्हणतो आहे:

  गुणाची आहे पोर… God Bless you beta !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s