बदललेली मानसिकता…..(?)

 

 . माझ्या मैत्रिणीचे एकत्र कुटुंब आहे. म्हणजे सासूसासरे, मैत्रिण, तिचा नवरा व त्यांची दोन मुले. तिचा मोठा दीर व जाऊ नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात राहतात. तिची जाऊ नोकरी न करणारी….तिच्या सासरी आधीच्या किंवा आताच्या पिढीत कोणीही स्त्री (सासू, जाऊ, नणंद , काकू, मामी, मावश्या वगैरे) नोकरी करत नव्हती. माझी मैत्रिण व तिचा नवरा दोघेही डॉक्टरत्यामुळे तिच्या लग्नाच्या आधीपासून हे स्पष्ट होते की ती केवळ परंपरा आहे म्हणून घरात राहणार नाही. सुरवातीला तिचा हॉस्पिट्लमध्ये पूर्णवेळ जॉब होता. पण नंतर घरातल्या जबाबदा‍र्‍या वाढल्या, वयोमानाप्रमाणे घरातल्या ज्येष्ठांच्या तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या, तिच्या नवर्‍यानेही स्वतःचे क्लिनिक काढले. गायनॉकॉलॉजिस्ट म्हणुन तिने अर्धवेळ क्लिनिकला जायचे ठरवून हॉस्पिट्लचा पूर्णवेळ जॉब सोडला. पण डॉक्टर म्हंटलं की वेळेचं बंधन पाळता येत नाही. घरातल्या ज्येष्ठांची मानसिकता अशी– “आमची सून नोकरी करते. आमच्या सात पिढ्यात कोणी स्त्री कामानिमित्त घराबाहेर पडली नव्हती. पण आम्ही उदार मतवादी आहोत. सुन एवढी शिकलीय ते काय घरात बसायला? घरात आजीआजोबा असताना मुलं बाहेर कुठे पाळणाघरात ठेवायची हे काही पटत नाही. म्हणून आम्ही सांगितलंय्‌, मुलांना सांभाळायला आम्ही आहोत , तू कर जॉब. ” एकीकडून अशी परवानगी द्यायची आणि दुसरीकडून ती नोकरी करणारीत्यामुळे घरातले सणवार, रीतभात काय सांभाळणार?मोठीच करू दे सगळं. नातेवाईक पण आमच्याकडे येताना विचार करतात की सून घरी नसणार,मग म्हातार्‍या लोकांना काम पडणार, सुट्टीमध्ये त्यांचा कुठेतरी बाहेर जायचा प्रोग्राम असणार त्यापेक्षा नकोच ते भामरेंकडे जाणे. म्हणून आमच्याकडे कोणी नातेवाईकही येत नाहीत. पूर्वी असं नव्हतं कायम कोणी ना कोणी पाहुणा असायचाच. आणि आता नातवंडं ही आमच्याकडे असतात. त्या जबाबदारीमुळे आम्हीही कुठे जाऊ शकत नाही. चालायचंच सुनेनं नोकरी करायची म्हणजे हे होतंच. ” म्हणजे माझ्या मैत्रिणीला तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
टीव्हीवरच्या मालिकांमध्ये दाखवतात तसं शिकलेली सून म्हणजे वरचढपणा करणार; घरातली कामं, जबाबदार्‍या टाळण्यासाठी नोकरी करणार. म्हणजे काय तर एक विशिष्ठ चष्मा लावून हे लोक शिकलेल्या व नोकरी करणार्‍या सुनेकडे पाहणार. बाकी सगळे (म्हणजे टीव्हीवरच्या मालिकांमध्ये दाखवतात ते) जसे तशीच ही पण असणार. ती खरंच तशी आहे कां ? याचा विचारही करणार नाहीत.

आणि आपण म्हणतो की लोकांची मानसिकता बदललीय्‌.
 
. माझी कामवाली बाई एकदिवस खूप उशीरा आली व नेहमीप्रमाणे गप्पा वगैरे न मारता पटापट कामाला लागली. आल्या आल्या मला विचारलं, “ताई, किती वाजंलं?”. “साडेतीन वाजलेत.” असं मी सांगितले. आभाळ खूप अंधारून आले होते. त्यामुळे मला असं वाटलं की पाऊस यायच्या आत तिला घरी जायचे असेल. म्हणून मी म्हंटले, “काय तुळसाबाई , आज एकदम घाईत दिसताय?”. ती म्हणाली अवो ताई, काय सांगू. काल आमच्या एरीयातली एक बाई गायब झाली. लई शोदाशोद केली. तवा कळ्ळलं की ती तिच्या लव्हर बरोबर निघून गिल्याली हाय. अवो, चार चार पोरांना मागं टाकून ती ग्येली. म्हनं त्याच्यावर पिरेम हाय. बरं गेली ते गेली , पर आमच्या डोक्याला कार लावून ग्येली. आता आमच्या घरातले म्हनायला लागलेत की समदी कामं बंद करा , गप घरात र्‍हावा. पर आमी घरात र्‍हायलो तर घर कसं चालायचं? मंग म्हने येळेवर येत जा. मी कुटं कुटं काम करते ते समदं त्यांनी विचारलया. समदी कामं संपवून तीन वाजंच्या आत परत याया सांगिटलया. आता लैच टाईम झालाय. म्हून जराशी घाई चाललीया.”
सुशिक्षित- अशिक्षित असा फरक आहे कां?.
 
आणि आपण म्हणतो की लोकांची मानसिकता बदललीय्‌. 

केवळ मुद्दा समजायला सोपा जावा म्हणून वरची उदाहरणे घेतली आहेत. काही लोक असे आहेत म्हणून सर्वचजण अशा पद्धतीने विचार करतात असे मी तर म्हणणार नाही. हळूहळू लोकांची मानसिकता बदलतेय्‌…………
Advertisements

8 comments on “बदललेली मानसिकता…..(?)

 1. महेंद्र म्हणतो आहे:

  ही मानसिकता बदलणार पण नाही कधीच..

 2. Prasad म्हणतो आहे:

  thanks for sharing your thoughts….it is seen in every house…:-(

 3. bhagwanagapurkar म्हणतो आहे:

  Namaskar

  Changal lihil aahe.

  Bhagwan

 4. सौरभ म्हणतो आहे:

  😀 😀 प्रत्येक समाजाच्या कुटुंब पद्धतिचे काही फायदे काही तोटे असतातच. पण सकारात्मक बदल हवेच. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s