है लफंगा बडा…..


कालचा दिवसच वेगळा होता. आम्ही (मी , नवरा व श्रृती) सहज म्हणून बिग बझारमध्ये जातो काय , नवरोबांच्या मनात सहज पिक्चर पाहण्याचा विचार येतो काय आणि आम्ही चक्क ‘लफंगे परिंदे’(स्टारकास्ट दिपिका पडुकोण , नील नितिन मुकेश) या पिक्चरची संध्या. ७.१५ च्या शोची तिकीटे संध्या. ७.३० वाजता मिळवून(!!) तो पिक्चर पाहतो काय….सगळंच वेगळं…… अगदी सर्वच अनपेक्षित…..


कोणताही ‘रिव्ह्यू’ न घेता आम्ही पाहिलेला सिनेमॅक्समधला पहिला पिक्चर
– ज्याला १५ मि. उशिरा जाऊनही तिकीटे विनासायास मिळाली.(रिव्ह्यून घेतल्याचा परिणाम…)
– आतमध्ये प्रवेश केल्यावर ‘या , कुठेही बसा , थिएटर आपलंच आहे ’ असं आमंत्रण मिळाल्यासारखं वाटलं. (कारण आम्ही प्रवेश केला त्यावेळी मोजून ३०-३५ खुर्च्या भरलेल्या होत्या.)(‘रिव्ह्यून घेतल्याचा परिणाम….)पहिली १५ मि. चुकल्यामुळे पिक्चर समजून घेण्यात काहीच अडचण आली नाही.(‘रि’ न घे प…)उलट बहुतेकदा पुढे काय होणार हे आम्ही संगितल्याप्रमाणेच घडत होते. जसं की नीलच्या गाडीने अ‍ॅक्सिडेंट झालेली व्यक्ती दिपिका असणार , अ‍ॅक्सिडेंटमध्ये तिची दृष्टी जाणार , तिला सावरण्यासाठी नीलच मदत करणार पण तिला हे माहित नसणार की तिची दृष्टी जाण्यास तोच कारणीभूत आहे , मग तो तिला स्कॆट डान्समध्ये पार्ट्नर म्हणून उभा राहणार , ते दोघं एका रिअ‍ॅलिटी शोच्या फायनल पर्यंत पोचणार आणि फायनलच्या आदल्या रात्री तिला सत्य परिस्थिती कळणार मग….फैसले की घडी….शेवट गग्गोड्‌ड्‌ड्ड……


काय नाही आहे या पिक्चरमध्ये….
– एक दादा आहे जो सट्टा लावून बॉक्सिंगच्या मॅचेस घेतो ,
– हिरो (नील) ज्याला ‘वन शॉट नन्दू’ म्हणतात कारण तो डोळे बांधून फाइट करतो आणि सुरवातीचा काहीवेळ प्रतिस्पर्ध्याकडून कचकचीत मार खाऊन चेहरा रक्तबंबाळ झाल्यावर एकच शॉट असा मारतो की प्रतिस्पर्धी चारी मुंड्या चीत…. ,
– मुंबैतले टिपिकल चाळीतले वातावरण , दहीहंडी , नवरात्र , गरबा , दिवाळी ….
– हिरॉइन (दिपिका) जी एका मॉलमध्ये काम करत असते, जिला स्केट डान्सची आवड असते आणि खात्री असते की ती एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये ‘परफॉर्म’ करून ५० लाखाचे पहिले बक्षिस जिंकणार , दृष्टी गेल्यावरही जी हिंमत हरत नाही (दिपिकाचा अभिनय मात्र खरंच चांगला झालाय) ….,
– एक सहृदय पोलिस इनस्पेक्टर जो हिरोच्या लव्हस्टोरीला मदत करण्यासाठी दादाला (तोच तो सट्टा लावून बॉक्सिंगच्या मॅचेस घेतो आणि गॅंगवॉर घडवून आणतो , खुनाची सुपारी देतो) या केसपुरता सोडून देतो व त्याला नंतर कोणत्यातरी केसमध्ये अडकवायचे ठरवतो ,
– प्लस पॉइंटस्‌ जसं की ‘कुछ पाने के लिये येडा बनना जरूरी है’ , नीलचं दिप्सला ती अंध झाल्यानंतर, तिला स्पर्श , गंध ,श्रवण यांच्या जाणीवा कशा वाढ्वायच्या हे शिकवणं ,हा भाग छान झालाय. (२ तासाच्या चित्रपटातील ७ मि. चा भाग!!!)
– दिप्सचं ‘फैसले की घडी’ च्या वेळेस डोकं , मन , भावना शाबूत ठेवून निर्णय घेणं ….
– है लफंगा बडा…. हे FM वर सतत ऎकू येणारं गाणं (जे ऎकून मला वाटलं होतं की ते ’काईटस’ मधलं आहे. पण ते या पिक्चरमध्ये आहे. अर्थात फरक काहीच पडत नाही कारण दोन्ही पिक्चर एकाच ड्ब्यात गेलेत…)


रिकामं सिनेमॅक्स कसं दिसतं , रिव्ह्यू न घेता पिक्चर पाहिल्याचे परिणाम काय असतात , पिक्चरमध्ये पुढे काय होणार आहे हे आपल्याला ओळखता येतं कां , ठोकळा चेहरा म्हणजे काय(पक्षी : नील) , ‘वाट लगाना’ म्हणजे काय , आपले पैसे पुरेपूर वसूल करायचेच असं ठरवून जागं रहाणं म्हणजे काय हे सर्व स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून समजून घ्यायचे असेल तर जरूर पहा ‘लफंगे परिंदे’…..


ता. क – केलेली भकितं खरी होतायत की नाही हे पाहण्यासाठी मी पूर्ण पिक्चरभर जागी होते . पिक्चर संपल्यावर नवर्‍याला उठवलं उठ बाबा , संपला (एकदाचा) पिक्चर, घरी जाऊया.

8 comments on “है लफंगा बडा…..

 1. sahajach म्हणतो आहे:

  >>>>> ता. क – केलेली भकितं खरी होतायत की नाही हे पाहण्यासाठी मी पूर्ण पिक्चरभर जागी होते . पिक्चर संपल्यावर नवर्‍याला उठवलं ‘उठ बाबा , संपला (एकदाचा) पिक्चर, घरी जाऊया’ .

  हे सगळ्यात सही!! 🙂

 2. सचिन म्हणतो आहे:

  हेहेहे नवरोबाला झोप आल्यानेच त्यांना पिक्चर पाहण्याचा विचार आला असावा.
  बाकी सिनेमागृहात झोपण्यासारख सुख नाही.

 3. महेंद्र म्हणतो आहे:

  धन्यवाद. मी पहाणार होतो.. वाचलो… 🙂

  • प्रज्ञा म्हणतो आहे:

   काका , दिप्स या पिक्चरमध्ये छान दिसलीय्‌ .चक्क माझ्या नवर्‍याची ही कमेंट आहे. ( अधून-मधून जागा असताना त्यानं जेवढा पिक्चर पाहिला तेवढ्यात त्याला जेवढी दिप्स दिसली तेवढी ती छान दिसलीय्‌. ) so , तिच्यासाठी हा पिक्चर पहायला हरकत नाही.

 4. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  चला मी हा पिक्चर न पाहुन वाचलो..पण काईट इतकाही वाईट नव्हता हो….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s