पॅकेज…..

 

वेगवेगळ्या कंपन्या , मोठ्मोठे शॉपिंग सेंटरस्‌ यांनी देऊ केलेले बर्‍याच प्रकारचे पॅकेजेस्‌ आपण ऎकतो. उदा. मोबाईल कंपनी जी ‘हॅडसेट्वर सिम कार्ड’ फुकट असे पॅकेज देते. किंवा एखादे फर्निचरचे दुकान जिथे बेडरूम सेट बरोबर ड्रॆसिंग टेबल फुकट असे पॅकेज मिळते…. थोडक्यात काय तर निरनिराळ्या प्रकारच्या ग्राहकांना आपल्याच दुकानात खरेदी करण्यास आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची पॅकेजिस्‌ देऊ केली जातात. आपला बिझनेस वाढणे हा एकमेव उद्देश या वेगवेगळ्या ऑफर स्कीमस्‌ मध्ये असतो. अगदी नवीन जॉब जॉइन करतानासुद्धा जी कंपनी चांगले ‘सॅलरी’ पॅकेज देते ती बहुदा स्विकारली जाते.

सध्या नाशिकच्या मात्तबर अशा वृत्तपत्रांमधून एक ‘पॅकेज’ देणारी जाहीरात येत आहे , तीही नाशिकमधल्या ख्यातनाम अशा हॉस्पिटलकडून!!! चक्रावलात नां? खरंय्‌….नाशिकमधल्या एका ‘स्पेशालिटी’ हॉस्पिटलकडून एक ‘पॅकेज’ दिलंय्‌ …ते ही ‘अ‍ॅंजिओप्लास्टीसाठी’……. आमच्याकडे ‘अ‍ॅंजिओप्लास्टी’ केली तर ‘अ‍ॅंजिओप्लास्टीचा खर्च , ३ दिवसांचा हॉस्पिटलमधला निवास (१ दिवस ICU , २ दिवस AC room) , दिवसातून ७ वेळेस आहारातज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार , औषधोपचारांचा खर्च (याला * मार्क आहे… अर्थात अटी लागू….) आणि….१८ महिन्यांची ‘वॉरंटी’……अजून बर्‍याच गोष्टी आहेत , काहींना * मार्क आहे… हे सर्व फक्त ९५००००/- मध्ये…… हे वाचल्यावर कोणत्याही सामान्य माणसाला काही प्रश्न पडू शकतात. जसे…

१. ऑफर आहे तोपर्यत अ‍ॅंजिओप्लास्टी करून घ्यावी कां? (गरज  आहे की नाही हा भाग वेगळा!!)
२. १८ महिन्यांची ‘वॉरंटी’ म्हणजे काय? (१८ महिन्यांनंतरच blockages होणार की १८ महिन्यांनंतर परत अ‍ॅजिओप्लास्टी करून घ्यावी लागणार?)


म्हणजे हे तर एखाद्या शॉपिंग मॉलसारखे झालं नां…. ग्राहकांना अर्थात पेंशंट्सना आपल्याच हॉस्पिटलमधून ‘अ‍ॅंजिओप्लास्टी’ करून घेण्यासाठी ऑफर….डॉक्टर हा देव आणि पेशंट्सचा आजार बरा करणे हा सेवाधर्म असा (पुरातन काळातील) विचार माझ्या मनात अजिबात नाही….. ‘डॉक्टरकी’ हा बिझनेस झाला आहे हे आतापर्यंत ऎकूनच होते, पण हॉस्पिटलसच्या अशा जाहीराती या बिझनेसबद्दल ओरडून सांगत असतात. थोडक्यात काय तर चकाचक हॉस्पिटल , ईतर उत्तम सोयी-सुविधा आणि मुख्य म्हणजे ‘पॅकेज ऑफर’ या गोष्टी महत्वाच्या आहेत. डॉक्टरस् ची गुणवत्ता , पेशंट्सची काळजी , ऑपरेशनसाठी वापरायची उपकरणे या दुय्यम गोष्टी आहेत…….

Advertisements

9 comments on “पॅकेज…..

 1. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  अगदी बरोबर आहे. सगळीकडे आता सेवा न रहाता ‘धंदा’ झाला आहे

 2. सुधीर म्हणतो आहे:

  खरच अशी जाहीरात आली आहे का? असल्यास वैद्यकीय द्रुष्ट्या हे बरोबर नाही.

 3. महेंद्र म्हणतो आहे:

  आवरा या लोकांना. हे मात्र फारच जास्त झालं.. उद्या स्मशानाची पण जाहिरात करतील एका अग्नि वर दुसरा फुकट- काही सांगता येत नाही.

 4. सौरभ म्हणतो आहे:

  खरच आवरा!!! 😀

 5. सुहास म्हणतो आहे:

  काय बोलू.. माझी तर बोलती बंद झाली डॉक्टरांनी सांगितलेली रक्कम ऐकून आणि ती मला दोन तासात जमा करायची होती…. कठीण आहे सगळं 😦 😦

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s