गज्जर का हलवा …..‌‍‍माँ….

 

आज सकाळीच नाश्त्यासाठी कोबीचे पराठे केले होते. ते बघून अहो म्हणाले, “अरे वा!! कोबीचे पराठे !!!!(आवाजात खूप आश्चर्य व आनंद !!!!). मी मनात म्हणाले,” याला कोबीचे पराठे इतकें कधीपासून आवडायला लागले ?” . मग लक्षात आले हा काल पाहिलेल्या मुझसे दोस्ती करोगे?’ या चित्रपटाचा परिणाम….त्यामध्ये नाही का राणी मुखर्जी जिथे शक्य असेल तिथे ह्रितीक रोशन साठी गोभी के पराठेत्याला खिलवत असते……मग मीही विचार केला माझ्या ह्रितीकसाठी (माझे अहो हो!) आपणही कोबी के पराठे करावेत….(थांबा, मला माहीती आहे की कोबी आणि गोभी यांत तेवढेच अंतर आहे , जेवढे कोबी आणि फ्लावर यांत आहे….पण याबाबतीत आमची (मी, अहो, लेक) नावड सारखी आहे.आम्हाला (मी, अहो, लेक) फ्लावरचा फ्लेवर आवडत नाहीम्हणून कोबी!!!)

तर या हिंदी चित्रपट सृष्टीने बऱ्याच पदार्थांना ग्लॅमर प्राप्त करून दिले आहे…. जसं पूर्वीच्या हिंदी सिनेमात माँ ने तिच्या लाडल्या बेट्यासाठी किंवा भाभीने लाडल्या देवरसाठी गज्जर का हलवाबनवलेला असतो व तो खाऊनच बेटा किंवा देवर बाहर जातो…. तसंच मक्के दि रोटी, सरसों दा साग’ !!!! मी लहानपणी आईवर चिडायचे की तुझं माझ्यावर प्रेमच नाही…. तू माझ्यासाठी सरसों का सागकां बनवतं नाहीस ????? पुढे मोठेपणी तरला दलाल , संजीव कपूर , मंगला बर्वे वगैरे पाककलागुरूंशी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून (अर्थात एकतर्फी!!!) शोध लागला की सरसों का सागम्हणजे मोहरीच्या पानांची भाजी !!!!’….(आमच्यावेळी हिंदी इयत्ता ५ वीत चालू व्हायचे ते ७ वी पर्यंत असायचे. माझे नंतर १०० मार्कांचे संस्कृत होते. त्यामुळे हिंदीशी फारसा सलोखा नव्हता. म्हणून सरसों म्हणजे मोहरी हे कळायला बरीच वर्षे जावी लागली.) मग पटले , माझ्या आईचे माझ्यावर किती प्रेम आहे ते…. कारण मला मोहरी बिलकूल आवडत नाही.( इथेही आमचीनावड सारखी आहें). पूर्वी (आई स्वयंपाक करायची तेव्हा)शाळा कॉलेज च्या जेवणाच्या सुटीतला निम्मा वेळ हा भाजीतील मोहरी वेचून बाजूला काढण्यात जायचाआता मी स्वयंपाक करते तर १ किलो मोहरी मला १ वर्ष पुरते….

मध्यंतरी आलू के पराठे पण हिंदीत बरेच लोकप्रिय होते…. (बहुतेक)‘छोटीं छोटीं बातेंमध्ये अमोल पालेकर त्याच्या हीरॉईणीसाठी (नाव विसरले….) चिकन आलाफुज(बहुतेक) ही डीश मागवताना दिसलाय….. त्यानंतर आलेल्या मारधाड पटांतून हृदयात शिरण्याचा मार्ग पोटातून जातोयाचा विसर पडल्यामुळे जेवणाखाण्याला कमी फुटेज मिळाले…. नवीन चित्रपटापैकी धुम मध्ये ऐश्वर्या ,ह्रितीक(अगेन!!) कडून वडापाव (देशी बर्गर) मागून खाताना दिसलीय….. ‘डुप्लीकेटमध्ये शाहरूखची (DDLJ तली सासूमां) मां, फरिदा जलाल जापनीज लोकांसाठी पंजाबी पध्दतीचे जापनीज जेवण बनवते असा उल्लेख आला आहें…..(मी शाहरूखची पंखी होते म्हणून त्याचे बरेच निर्बुद्ध सिनेमे पाहिले आहेत. त्यापैकीच हा डुप्लीकेट’!!!)….. ह्रितीक(अगेन) अमिषासाठी कहो ना….. ‘ मध्ये एग ओम्लेट बनवताना (अगदी कांदा कापून अंडं फोडण्यापर्यंत ) दाखवला आहें……लेटेस्ट ३ इडियट्समध्ये राजूची(शर्मन जोशी) आई खूजालीवाला खानापरोसाताना दाखवली आहें….बाकी भगवानजी का प्रशादतर असतोच…. 

त्यामानाने मराठीत कांदाभाकर ,झुणकाभाकर, शिरा. पदार्थच प्रकाशझोतात आले….. ‘मसालेदार चिवडामात्र गाण्यातसुद्धा स्थान मिळवू शकला…. ‘मुंबईचा फौजदारमध्ये रंजना वांग्याची भाजी उत्तम करते (चित्रपटात हो…) असा उल्लेख आहें…… बाकी आपले खारे दाणे , चणे खूप पॉप्युलर झालेत, पण खाण्यापेक्षा त्यांचा जास्त उपयोग हा खाना बनानेवालीकोजवळ लाने के लिये होता है!!!!!

 

Advertisements

5 comments on “गज्जर का हलवा …..‌‍‍माँ….

 1. ngadre म्हणतो आहे:

  kaay abhyaas..vah..great..
  Interesting post..

  • प्रज्ञा म्हणतो आहे:

   आवर्जून ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आभार. 🙂 अभिप्रायाबद्दल धन्यवाद . अजून एक add करायचं राहिलंय्‌….भाग्यश्री MPK (मैने प्यार किया) त पुर्‍या तळताना दाखवली आहे. आणि बिचारी जूही QSQT (कयामत से कयामत तक) मध्ये रडताना दिसलीय्‌ …. ’हमें खाना बनाना नही आता !’ म्हणून………… पोस्ट लिहून झाल्यावर हे आठवलं….. :):)

 2. आनंद पत्रे म्हणतो आहे:

  सगळं झालं फक्त जेवणानंतरच्या विड्याचा उल्लेख राहीला (खईके पान बनारस वाला)…
  मस्त लेख आणि निरिक्षण

 3. सौरभ म्हणतो आहे:

  आम का आचार, चाट, पाणीपुरी, कटिंग चाय, बैंगन का भरता…. बापरे बऱ्याच खादाड्या राहिल्यात. यादी नं संपणारी आहे. nice post 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s