रोमॅंटिक पाऊस……..

 

काल नाशिकमध्ये मस्त धुवॉंधार पाऊस पडला. सकाळपासूनच खूप गरम होत होतं.वारा नाही…नुसतं रणरण ऊन….नुसती चिड्चीड होत होती…अस्सं कोंदट , निस्तॆज वातावरण झालं होतं ….आणि दुपारनंतर आकाशात काळ्या मेघांची गर्दी होऊ लागली. छान , मस्त गारवा देणारे वारे सुटले….हळूहळू पावसाचे थेंब टपट्पू लागले…..आणि नंतर जोरात पाऊस कोसळू लागला…..एकदम मोकळं मोकळं वाटायला लागलं… पाऊस पडून गेल्यानंतर सगळं कसं छान स्वच्छ दिसतं…ओले रस्ते, हिरवीगार चकाकणारी झाडे…मला पाऊस खूप आवडतोच पण त्याच्या येण्याची ही पूर्ण process सुध्दा मी enjoy करते…

तप्त धरतीवर पावसाच्या शिडकाव्याने पसरलेल्या मृद्‌गंधाबरोबर मस्त रोमॅंटिक गाणी मनात झंकारू लागतात. ‘लगी आज सावन की फिर वो झडी है…’(चांदनी),‘एक लडकी भीगी भागीसी, सोती रातोंमे जागीसी’(नाम बताने की जरूरत नही…Ever time fevorite),’सागर किनारे, दिल ये पुकारे…’(सागर),‘हमको हमींसे चुरालो…,दिल में कहीं तुम छुपालो….’(मोह्ब्बतें) , आणि माझं सर्वात आवडतं गाणं ‘रिमझीम गिरे सावन,सुलग सुलग जाए मन…भिगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन….’Ultimate….मग फक्त हे गाणंच आठवत नाही तर पावसात भिजत फिरणारे अमिताभ-मौसमी डोळ्यासमोर दिसायला लागतात. भिजलेल्या मनाला असं छान हळूवार, तरल वाटायला लागतं….असा तरल पाऊस नेहमी अनुभवता येत नाही…. मनाच्या एका विशिष्ट स्थितीत,आजूबाजूच्या मस्त रोमॅंटिक वातावरणात जेव्हा पाऊस मनात झिरपतो….तेव्हा ‘सुलग सुलग जाए मन…’ मनाचे पापुद्रे सुट्टे होतात….. सगळी किल्मिषं, नाराजी धूवून जाते….एक छान , कोवळी प्रसन्नता मनात भरून राहते…..

भर कोसळणार्‍या पावसात , जोडीदाराच्या हातात हात घालून समुद्रकिनार्‍यावरच्या रेतीत अनवाणी चालणं…..ही माझी  Ultimate date आहे…माझ्या मनात समुद्र आणि पावसाचं एक वेगळंच नातं आहे. अथांग पसरलेल्या समुद्रात पावसाचे टपट्पणारे थेंब बघत, त्या कोसळणार्‍या सरींमध्ये भिजत राहणं….आह्‌…आयुष्य याच क्षणात गोठून जायला हवं……

2 comments on “रोमॅंटिक पाऊस……..

  1. सुहास म्हणतो आहे:

    वाह वाह… एकदम रोमॅंटीक !!

    आम्हा डोंगरवेड्या लोकांना पाऊस म्हटलं की, फक्त किल्ले आठवतात. समुद्र किनाऱ्यावरून कधी चालायला मिळतंय बघुया 🙂 🙂

    • प्रज्ञा म्हणतो आहे:

      मी, माझा नवरा , माझी लेक आम्ही तिघेही समुद्र्वेडे आहोत….आमच्या भटकंतीमध्ये समुद्र किनार्‍याच्या भागाचा समावेश असतोच असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s