नाशिक….कोल्हापूर

 

मागच्याच आठवड्यात कोल्हापूरला जाऊन आले. शाळा, कॉलेज पासून ते इंजिनियरींग पर्यंत २०-२२ वर्षे जिथे राहिले ते कोल्हापूर!! यावेळी प्रकर्षाने जाणवले की कोल्हापूर काहीच बदललेलं नाहीय्‌. या दहा वर्षात नाशिक केवढं बदललंय्‌!!! नवे मॉल्स, नवनवीन दुकाने, रोज नव्या उभ्या राहणार्‍या इमारती….. त्यामानाने कोल्हापूर मात्र दहा वर्षापूर्वी होतं तसंच आहे. तीच दुकाने , मार्केट …अगदी कोपर्‍यावरचे इस्त्रीचे दुकानही तसेच दहा वर्षांपूर्वीसारखे….वाड्यांच्या जागी अपार्टमेंटस्‌ उभ्या राहिल्यात्‌ एवढाच काय तो फरक….आपल्याला नेहमी काहीतरी नवीन हवं असतं. जून्या गोष्टी जतन करणे हा वेगळा भाग आहे आणि बदल न करणे हा वेगळा भाग आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर बदललेलं नाही’ या भावनेने खूप उदास वाटत होते.

आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला, मी कोल्हापूर बदललेलं नाही असे जे म्हणतीय्‌ ते कोणत्या context मध्ये? तर महालक्ष्मी  मंदिराच्या आजूबाजूच्या ५-१० कि.मी.च्या आतील परिसर…..पण त्याबाहेर कोल्हापूर प्रचंड वाढलंय्‌. पूर्वी साने गुरूजी वसाहत, आर्‌.के.नगर, मोरेवाडी असे जे भाग खूप लांब,गावाबाहेर वाटायचे ते आता ऎन गावात आलेत. या भागांमध्ये तर खूपखूप बदल झालेत. नाशिकचेही तसेच….गंगापूर रोड , कॉलेज रोड , महात्मा नगर या भागात लोकवस्ती वाढली व त्यानुरूप बरेचसारे बदल झालेत….. पण जूनं नाशिक पूर्वी होतं तसंच आहे…

या लख्ख प्रकाशात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आपण कशावर concentrate करतोय्‌ , कुठला reference वापरतोय्‌ हे खूप महत्वाचे आहे. जो विचार करून मी स्वत:लाच उदास करत होते त्याचा पायाच चुकिचा होता. दोन वेगवेगळ्या गोष्टींची, संदर्भ नसताना मी तुलना करत होते आणि अपेक्षित उत्तर मिळत नाही म्हणून निराश होत होते. हे म्हणजे हत्ती आणि चार आंधळ्यांच्या गोष्टीसारखे झाले…(एक आंधळा हत्तीच्या पायाला हात लावून म्हणतो की हत्ती हा खांबासारखा आहे , दुसरा हत्तीच्या शेपटीला हात लावून म्हणतो की हत्ती हा दोरीसारखा आहे इ. इ.). कुणाचंच मत चूकीचं नसतं पण प्रत्येकाचा reference वेगळा म्हणून निष्कर्षही वेगळा…..So, आपण कशावर फोकस करतोय्‌ , कोणत्या संदर्भात विचार करतोय्‌ याचा आधि विचार करायला हवा ….आणि मग निष्कर्षापर्यंत पोहोचायला हवे.

 

2 comments on “नाशिक….कोल्हापूर

 1. minakshi म्हणतो आहे:

  Pradnya,
  khup chan vatala apala blog baghun.Mi hi Kolhapurchi ahe sadhya rahanar Udaipur(Rajasthan).
  Atta paryaryant ekahi Kolhapurkaracha blog vachanat ala navata…..kharach apala blog pahun anand vatala.
  Apalya Avadi Nivadi agadi majhyashi julat ahet …….khup chan vatala.

  • प्रज्ञा म्हणतो आहे:

   ‘जीवनतरंग’वर आपले स्वागत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कोल्हापूरचं कोणी भेटलं की छान वाटतं. अभिप्राय देणाऱ्यांत कोल्हापूरच्या तुम्हीही पहिल्याच!!!!. :)माहेरचं कोणीतरी भेटल्याचा आनंद झाला . 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s