थुंके … पिंके …. शिंके….

 

 थुंके ,पिंके, शिंके (खरंतर हा शब्द मी उधार घेतलाय्‌. बहुतेक पु.. किंवा अत्रें चा) या अतिशय किळसवाण्या जमाती आहेत….sorry , पोस्ट्च्या सुरवातीलाच मी नकारात्मक विधान करतेय्‌….पण काय करू…? या लोकांचे वागणे , specifically थुंकणे पाहीले की खूप संताप होतोअसं वाटतं की जशी सार्वजानिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे , तशी यांच्या थुंकण्यावर आणि पिंक टाकण्यावर बंदी आणायला हवी. माझ्या पाहण्यात तरी सध्या शिंक्यांचेप्रमाण कमी आहे . पूर्वी काही लोकं मुद्दाम तपकीर ओढून शिंका काढायचे, सध्यातरी तशी लोकं दिसत नाहीतया थुंके आणि पिंके यांनी मात्र वात आणलाय्‌आणि सार्वजानिक मालमत्तेची वाट लावायला लागलेत….थुंकण्याने फक्त घाण होत नाही तर जंतू पसरून काही संसर्गजन्य आजार होऊ शकतात. गुटखा खाण्याचे काय दुष्परीणाम आहेत, हे तर सर्वज्ञात आहे. तरीही हम नही सुधरेंगे!’

बस स्टॉप, रस्ते , बसेस , दुकांनांच्या पायर्‍या , रस्त्यावरचे दिव्यांचे खांब , अपार्टमेंटच्या जिन्यांचे कोपरे, झाडं, कचर्‍याच्या पेट्या एकही गोष्ट अशी नाही कि ती या लोकांनी पिंकूनरंगवली नाहीय्‌मध्यंतरी, पिंकण्यापासून सुटकेसाठी एक वेगळाच उपाय बर्‍याच अपार्टमेंटमध्ये वापरला जायचा. जिन्यांच्या पायर्‍यामध्ये , कोपर्‍यामध्ये देवादिकांचे फोटो लावायचे. म्हणजे निदान किमान या जागा तरी बिना रंगकामाच्याराहतील. पण हा उपाय म्हणजे भीक नको पण कुत्रा आवरया category तला झाला. पिंकण्यापासून सुटकेसाठी देवालाच वेठीला धरायचे हे मला तरी पटले नाही.

बरं थुंकताना ,पिंकताना हे लोकं साधं भानही ठेवत नाहीत. वेगात असलेल्या गाडीतून तोंड बाहेर काढून पिचकारी टाकली की, हे चालले पुढेअरे, मागच्यांच्या अंगावर, गाडीवर ती घाणपडेल, याचा विचार तर करा….याच संदर्भात पुण्यात घडलेली एक घट्ना आठवली. पुण्यात एक मुलगी स्कूटीवरून जात असताना शेजारून जाणार्‍या एका बाईकवाल्याने पिचकारी टाकली, ती त्या मुलीच्या ड्रेसवर व स्कूटीवर पडली. पुढे सिग्नलला तो मुलगा दिसल्यावर ती सरळ त्याच्याकडे गेली व त्याचा रूमाल मागितला. तो बाइकवाला चाट! एक मुलगी कां रूमाल मागतेय? (तोपर्यंत त्याला पत्ताच नाही की त्याच्या पिंकेने काय झालं आहे.) त्याने रूमाल दिला. त्या मुलीने ड्रेस, स्कूटीवरची घाण साफ करून त्याला तो रूमाल परत दिला. ‘मुन्नाभाई(MBBS)मध्ये दाखवल्याप्रमाणे गांधीगिरी करून , अशा लोकांना त्यांची चूक दाखवून हा प्रश्न सुटेल कां? कि कायद्याचा काही उपयोग होईल?

आंतरजालावरून साभार

गज्जर का हलवा …..‌‍‍माँ….

 

आज सकाळीच नाश्त्यासाठी कोबीचे पराठे केले होते. ते बघून अहो म्हणाले, “अरे वा!! कोबीचे पराठे !!!!(आवाजात खूप आश्चर्य व आनंद !!!!). मी मनात म्हणाले,” याला कोबीचे पराठे इतकें कधीपासून आवडायला लागले ?” . मग लक्षात आले हा काल पाहिलेल्या मुझसे दोस्ती करोगे?’ या चित्रपटाचा परिणाम….त्यामध्ये नाही का राणी मुखर्जी जिथे शक्य असेल तिथे ह्रितीक रोशन साठी गोभी के पराठेत्याला खिलवत असते……मग मीही विचार केला माझ्या ह्रितीकसाठी (माझे अहो हो!) आपणही कोबी के पराठे करावेत….(थांबा, मला माहीती आहे की कोबी आणि गोभी यांत तेवढेच अंतर आहे , जेवढे कोबी आणि फ्लावर यांत आहे….पण याबाबतीत आमची (मी, अहो, लेक) नावड सारखी आहे.आम्हाला (मी, अहो, लेक) फ्लावरचा फ्लेवर आवडत नाहीम्हणून कोबी!!!)

तर या हिंदी चित्रपट सृष्टीने बऱ्याच पदार्थांना ग्लॅमर प्राप्त करून दिले आहे…. जसं पूर्वीच्या हिंदी सिनेमात माँ ने तिच्या लाडल्या बेट्यासाठी किंवा भाभीने लाडल्या देवरसाठी गज्जर का हलवाबनवलेला असतो व तो खाऊनच बेटा किंवा देवर बाहर जातो…. तसंच मक्के दि रोटी, सरसों दा साग’ !!!! मी लहानपणी आईवर चिडायचे की तुझं माझ्यावर प्रेमच नाही…. तू माझ्यासाठी सरसों का सागकां बनवतं नाहीस ????? पुढे मोठेपणी तरला दलाल , संजीव कपूर , मंगला बर्वे वगैरे पाककलागुरूंशी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून (अर्थात एकतर्फी!!!) शोध लागला की सरसों का सागम्हणजे मोहरीच्या पानांची भाजी !!!!’….(आमच्यावेळी हिंदी इयत्ता ५ वीत चालू व्हायचे ते ७ वी पर्यंत असायचे. माझे नंतर १०० मार्कांचे संस्कृत होते. त्यामुळे हिंदीशी फारसा सलोखा नव्हता. म्हणून सरसों म्हणजे मोहरी हे कळायला बरीच वर्षे जावी लागली.) मग पटले , माझ्या आईचे माझ्यावर किती प्रेम आहे ते…. कारण मला मोहरी बिलकूल आवडत नाही.( इथेही आमचीनावड सारखी आहें). पूर्वी (आई स्वयंपाक करायची तेव्हा)शाळा कॉलेज च्या जेवणाच्या सुटीतला निम्मा वेळ हा भाजीतील मोहरी वेचून बाजूला काढण्यात जायचाआता मी स्वयंपाक करते तर १ किलो मोहरी मला १ वर्ष पुरते….

मध्यंतरी आलू के पराठे पण हिंदीत बरेच लोकप्रिय होते…. (बहुतेक)‘छोटीं छोटीं बातेंमध्ये अमोल पालेकर त्याच्या हीरॉईणीसाठी (नाव विसरले….) चिकन आलाफुज(बहुतेक) ही डीश मागवताना दिसलाय….. त्यानंतर आलेल्या मारधाड पटांतून हृदयात शिरण्याचा मार्ग पोटातून जातोयाचा विसर पडल्यामुळे जेवणाखाण्याला कमी फुटेज मिळाले…. नवीन चित्रपटापैकी धुम मध्ये ऐश्वर्या ,ह्रितीक(अगेन!!) कडून वडापाव (देशी बर्गर) मागून खाताना दिसलीय….. ‘डुप्लीकेटमध्ये शाहरूखची (DDLJ तली सासूमां) मां, फरिदा जलाल जापनीज लोकांसाठी पंजाबी पध्दतीचे जापनीज जेवण बनवते असा उल्लेख आला आहें…..(मी शाहरूखची पंखी होते म्हणून त्याचे बरेच निर्बुद्ध सिनेमे पाहिले आहेत. त्यापैकीच हा डुप्लीकेट’!!!)….. ह्रितीक(अगेन) अमिषासाठी कहो ना….. ‘ मध्ये एग ओम्लेट बनवताना (अगदी कांदा कापून अंडं फोडण्यापर्यंत ) दाखवला आहें……लेटेस्ट ३ इडियट्समध्ये राजूची(शर्मन जोशी) आई खूजालीवाला खानापरोसाताना दाखवली आहें….बाकी भगवानजी का प्रशादतर असतोच…. 

त्यामानाने मराठीत कांदाभाकर ,झुणकाभाकर, शिरा. पदार्थच प्रकाशझोतात आले….. ‘मसालेदार चिवडामात्र गाण्यातसुद्धा स्थान मिळवू शकला…. ‘मुंबईचा फौजदारमध्ये रंजना वांग्याची भाजी उत्तम करते (चित्रपटात हो…) असा उल्लेख आहें…… बाकी आपले खारे दाणे , चणे खूप पॉप्युलर झालेत, पण खाण्यापेक्षा त्यांचा जास्त उपयोग हा खाना बनानेवालीकोजवळ लाने के लिये होता है!!!!!

 

रोमॅंटिक पाऊस……..

 

काल नाशिकमध्ये मस्त धुवॉंधार पाऊस पडला. सकाळपासूनच खूप गरम होत होतं.वारा नाही…नुसतं रणरण ऊन….नुसती चिड्चीड होत होती…अस्सं कोंदट , निस्तॆज वातावरण झालं होतं ….आणि दुपारनंतर आकाशात काळ्या मेघांची गर्दी होऊ लागली. छान , मस्त गारवा देणारे वारे सुटले….हळूहळू पावसाचे थेंब टपट्पू लागले…..आणि नंतर जोरात पाऊस कोसळू लागला…..एकदम मोकळं मोकळं वाटायला लागलं… पाऊस पडून गेल्यानंतर सगळं कसं छान स्वच्छ दिसतं…ओले रस्ते, हिरवीगार चकाकणारी झाडे…मला पाऊस खूप आवडतोच पण त्याच्या येण्याची ही पूर्ण process सुध्दा मी enjoy करते…

तप्त धरतीवर पावसाच्या शिडकाव्याने पसरलेल्या मृद्‌गंधाबरोबर मस्त रोमॅंटिक गाणी मनात झंकारू लागतात. ‘लगी आज सावन की फिर वो झडी है…’(चांदनी),‘एक लडकी भीगी भागीसी, सोती रातोंमे जागीसी’(नाम बताने की जरूरत नही…Ever time fevorite),’सागर किनारे, दिल ये पुकारे…’(सागर),‘हमको हमींसे चुरालो…,दिल में कहीं तुम छुपालो….’(मोह्ब्बतें) , आणि माझं सर्वात आवडतं गाणं ‘रिमझीम गिरे सावन,सुलग सुलग जाए मन…भिगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन….’Ultimate….मग फक्त हे गाणंच आठवत नाही तर पावसात भिजत फिरणारे अमिताभ-मौसमी डोळ्यासमोर दिसायला लागतात. भिजलेल्या मनाला असं छान हळूवार, तरल वाटायला लागतं….असा तरल पाऊस नेहमी अनुभवता येत नाही…. मनाच्या एका विशिष्ट स्थितीत,आजूबाजूच्या मस्त रोमॅंटिक वातावरणात जेव्हा पाऊस मनात झिरपतो….तेव्हा ‘सुलग सुलग जाए मन…’ मनाचे पापुद्रे सुट्टे होतात….. सगळी किल्मिषं, नाराजी धूवून जाते….एक छान , कोवळी प्रसन्नता मनात भरून राहते…..

भर कोसळणार्‍या पावसात , जोडीदाराच्या हातात हात घालून समुद्रकिनार्‍यावरच्या रेतीत अनवाणी चालणं…..ही माझी  Ultimate date आहे…माझ्या मनात समुद्र आणि पावसाचं एक वेगळंच नातं आहे. अथांग पसरलेल्या समुद्रात पावसाचे टपट्पणारे थेंब बघत, त्या कोसळणार्‍या सरींमध्ये भिजत राहणं….आह्‌…आयुष्य याच क्षणात गोठून जायला हवं……