एक गोष्ट ….काही comments…..

 

माझ्या मुलीला – श्रृतीला (वय वर्षे ६) रात्री झोपवताना एक गोष्ट सांगत होते. खूप नाजूक , सात गाद्यांच्या पलंगावर झोपणार्‍या राजकन्येची ! आपल्यापैकी खूप जणांनी ही गोष्ट ऎकली असेल. तर या राजकन्येच्या पाठीवर वळ उठतो तो कशामुळे तर सात गाद्यांच्याखाली असणार्‍या एका केसामुळे…..इतकी ती नाजूक!!! ही गोष्ट श्रृतीला सांगितल्‍यानंतर अपेक्षित comments मिळाल्या नाहीत ….. त्‍यावरूनच या पोस्टचा विषय सुचला…..  या गोष्टीवर कोणत्‍या वयोगटातल्‍या व्‍यक्‍तींच्या, काय comments असतील?(comments = प्रतिक्रीया(???) Actually मला वाटते की प्रतिक्रीया म्हणजे reaction …… comments साठी योग्‍य मराठी प्रतिशब्द शोधायला हवा…….असो. अभिप्राय हा शब्द योग्य होईल कां?)

माझी पिढी – वय ६ ते ७ – हो? खर्रर्रर्रर्रच? (डोळे झाकून  विश्वास…)

आताची पिढी – वय ६ ते ७ – ती राजकन्या सात गाद्यांच्यावर कां झोपायची? ती एवढ्या उंचावर कशी चढायची ? (जिज्ञासू….स्वत:च्या बुद्धिला पटेल तेच करणार) वय १६ ते १८ – वॉव….. So cute…… (स्वप्नाळू वय….)

वय २३ ते २७ – हूं………अस्सं????? (या लोकांना अशा फॅण्टसीज्‌ कडे लक्ष द्यायला वेळ नसतो)

वय ३६ ते ४० – अग पोरी , वडीलांकडे चालतात असे नखरे…पण नवर्‍याकडे नाही चालायचे. आणि इतकं नाजूक राहून कसं चालेल, या वयातच हे हाल… तर पुढे कसं होणार? (काळजी….लगेच भावनावश होणे…)

अशीच एक दुसरी गोष्ट … ‘बाजीराव – मस्तानी’तल्या मस्तानीची.. मस्तानी इतकी गोरी व नाजूक कि तिने विड्याचे पान खाल्ले तर त्याचा रस तिच्या गळ्यातून उतरतानां दिसायचा….

माझी पिढी – वय ६ ते ७ – हो? खर्रर्रर्रर्रच?

आताची पिढी – वय ६ ते ७ – ई…. ते किती dirty दिसत असेल….(Very Practicle) वय १६ ते १८ –  Wowwwww!!!!….. So cute…… काय करत असेल ती अशा गोरेपणासाठी?  (बाह्यसौंदर्याविषयी वाढलेला सजगपणा)

वय २३ ते २७ – हूं………अस्सं?????

वय ३६ ते ४० – मुलांवर ओरडून आमच्याही घशाच्या शिरा ताणतात… त्या बघायला असतो कां कुणाला वेळ ? करतांयत्‌  मारे मस्तानीचं कौतुक…..

अर्थात्‌ ‘स्त्रीवर्ग’ कशाप्रकारे प्रतिक्रीया देईल त्याचा विचार करून वरील प्रतिक्रीया लिहल्या आहेत. पुरूषवर्ग अशा फॅण्टसीज्‌वर  comments करतो कां? माहीत नाही , अंदाजसुद्धा करता येत नाही…. जाणकारांनी अवश्य मार्गदर्शन करावे…..

(मिळालेला धडा – आताच्या मुलांना सांगायच्या गोष्टींची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते….)

 

4 comments on “एक गोष्ट ….काही comments…..

 1. sahajach म्हणतो आहे:

  >>>>> मिळालेला धडा – आताच्या मुलांना सांगायच्या गोष्टींची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते….

  एकदम मान्य… असेच अनुभव मलाही रोज येत असतात… 🙂

  • jeevantarang म्हणतो आहे:

   अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आजची पिढी खूप चौकस व जिज्ञासू आहे. डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवत नाही. हे सतत लक्षात ठेवावे लागते.

 2. Srinivas म्हणतो आहे:

  मी माझ्या मुलीला (वय ४ वर्ष) काऊ आणि चिऊ ची गोष्ट सांगत असतांना ती म्हणते ‘Daddy , Birds ना घर नसते. ते नेस्ट मधे राहतात. तुला ते कस माहित नाही?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s