खाण्याबाबतचे नखरे….

 

बर्‍याच जणांचे खाण्याबाबत बरेच नखरे असतात . म्‍हणजे अमुक भाजी आवडते ,तमुक भाजी पानातसुद्धा पडू देत नाही. कोबी,गवार,शेपू या काय भाज्या आहेत कां?वगैरे वगैरे ….आमच्या घरी भाजी कशी दिसावी याचे फंडे ठरलेले आहेत . सर्वांना झणझणीत तिखट आवडते, त्यामुळे कलर पाहून भाजी खायची कि नाही ते ठरवतात. छान लाल रंग असेल तर भाजी उत्तम झाली असणार नाहीतर आहेच हॉटेल झिंदाबाद!!!

माझ्या नवर्‍याला भाजीबाबत फारसे नखरे नाहीत..त्यामुळे मला सर्वांकडून ऎकावे लागते किप्र‍ज्ञाचं बरं आहे बुवा, भाजी कोणती करावी याची चिंता फारशी चिंता तिला नसते, रवीला काय सगळ्या(!!)भाज्या आवडतात”.पण माझ्या नवर्‍याचा मात्र वेगळाच फंडा आहे. पोळी कशी असावी याबाबत त्याची मते firm आहेत. पोळी कडेपर्यंत व्यवस्थित भाजलेली असावी , ती इतकी लुसलुशीत असावी कि फक्‍त तीन बोटांनी तुटायला हवी… अशा पोळीबरोबर मग भाजी कोणतीही चालते. पण पोळी जर कच्ची असेल तर मात्र चविष्ट भाजी असुनसुद्धा त्याचे जेवण अपूर्ण रहाते. माझी लेक पण बाबांवर गेली आहे . शेपूची भाजी तर तिला अत्यंत प्रिय…. तिला मंड‍ईत घेऊन गेले कि तिचा एकच हट्ट …‘आई शेपू घे नां…’

माझ्या काही मैत्रिंणींचे ऎकते नां घरात रोज तीन तीन भाज्या बनवतातकां तर एकाला वांगी आवडतात तर दुसर्‍याला वांग्याची अ‍ॅलर्जी…तर तिसर्‍याला बटाटयाशिवाय इतर काही चालत नाही.काहीजण म्हणतात कि अमुक भाजी मी आयुष्यात खाल्ली नाही ,खाणार नाही…

एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाण्याबाबतच्या आवडीनिवडी ठीक आहेत. पण परदेशात जिथे घरच्यासारखे खाणे मिळणे कठीण असते, तिथे जे मिळेल ते खावेच लागते… आपल्या देशात अशी बरीच लोकं आहेत ज्यांना एकावेळचे खाणे मुश्किलीने मिळते, त्यांना खाण्याबाबतचे नखरे परवडतच नाहीत….अशांचा विचार आपण जेवताना केला तर समोरची नावडती भाजी पण आनंदाने खाल्ली जाईल. मग ते केवळउदरभरण’ रहातायज्ञकर्म’ हो‍ऊन जाईल……

 

Advertisements

9 comments on “खाण्याबाबतचे नखरे….

 1. महेंद्र म्हणतो आहे:

  प्रज्ञा
  मस्त जमलंय बरं का पोस्ट . खूप छान.
  पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.

  • jeevantarang म्हणतो आहे:

   धन्यवाद महेंद्रजी . आपले लिखाण वाचुन तर मला स्फूर्ती मिळाली. ब्लॉगच्या दुसर्‍याच दिवशी प्रतिक्रीया मिळाल्याने उत्साह वाढला आहे.

 2. महेंद्र म्हणतो आहे:

  मराठी ब्लॉग विश्व वर ब्लॉग नोंदवा म्हणजे लोकांना समजेल तुम्ही नविन काही लिहिले की . ही आहे लिंक http://marathiblogs.net/

 3. Imran sayyed म्हणतो आहे:

  Dear PRM,
  It is nice to read your blog. I went into my childhood while reading the blog as was very much involved with such beutful marathi.

  eep blogging.

  Regards,

  Sayyed Imran

 4. Ravi.. म्हणतो आहे:

  Dear Tai…

  Keep Writing…
  Very good,

  Rgds, Ravi Kulkarni

 5. ashish kale म्हणतो आहे:

  Keep It up mam. veryyyy veryyy nice 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s