एक गोष्ट ….काही comments…..

 

माझ्या मुलीला – श्रृतीला (वय वर्षे ६) रात्री झोपवताना एक गोष्ट सांगत होते. खूप नाजूक , सात गाद्यांच्या पलंगावर झोपणार्‍या राजकन्येची ! आपल्यापैकी खूप जणांनी ही गोष्ट ऎकली असेल. तर या राजकन्येच्या पाठीवर वळ उठतो तो कशामुळे तर सात गाद्यांच्याखाली असणार्‍या एका केसामुळे…..इतकी ती नाजूक!!! ही गोष्ट श्रृतीला सांगितल्‍यानंतर अपेक्षित comments मिळाल्या नाहीत ….. त्‍यावरूनच या पोस्टचा विषय सुचला…..  या गोष्टीवर कोणत्‍या वयोगटातल्‍या व्‍यक्‍तींच्या, काय comments असतील?(comments = प्रतिक्रीया(???) Actually मला वाटते की प्रतिक्रीया म्हणजे reaction …… comments साठी योग्‍य मराठी प्रतिशब्द शोधायला हवा…….असो. अभिप्राय हा शब्द योग्य होईल कां?)

माझी पिढी – वय ६ ते ७ – हो? खर्रर्रर्रर्रच? (डोळे झाकून  विश्वास…)

आताची पिढी – वय ६ ते ७ – ती राजकन्या सात गाद्यांच्यावर कां झोपायची? ती एवढ्या उंचावर कशी चढायची ? (जिज्ञासू….स्वत:च्या बुद्धिला पटेल तेच करणार) वय १६ ते १८ – वॉव….. So cute…… (स्वप्नाळू वय….)

वय २३ ते २७ – हूं………अस्सं????? (या लोकांना अशा फॅण्टसीज्‌ कडे लक्ष द्यायला वेळ नसतो)

वय ३६ ते ४० – अग पोरी , वडीलांकडे चालतात असे नखरे…पण नवर्‍याकडे नाही चालायचे. आणि इतकं नाजूक राहून कसं चालेल, या वयातच हे हाल… तर पुढे कसं होणार? (काळजी….लगेच भावनावश होणे…)

अशीच एक दुसरी गोष्ट … ‘बाजीराव – मस्तानी’तल्या मस्तानीची.. मस्तानी इतकी गोरी व नाजूक कि तिने विड्याचे पान खाल्ले तर त्याचा रस तिच्या गळ्यातून उतरतानां दिसायचा….

माझी पिढी – वय ६ ते ७ – हो? खर्रर्रर्रर्रच?

आताची पिढी – वय ६ ते ७ – ई…. ते किती dirty दिसत असेल….(Very Practicle) वय १६ ते १८ –  Wowwwww!!!!….. So cute…… काय करत असेल ती अशा गोरेपणासाठी?  (बाह्यसौंदर्याविषयी वाढलेला सजगपणा)

वय २३ ते २७ – हूं………अस्सं?????

वय ३६ ते ४० – मुलांवर ओरडून आमच्याही घशाच्या शिरा ताणतात… त्या बघायला असतो कां कुणाला वेळ ? करतांयत्‌  मारे मस्तानीचं कौतुक…..

अर्थात्‌ ‘स्त्रीवर्ग’ कशाप्रकारे प्रतिक्रीया देईल त्याचा विचार करून वरील प्रतिक्रीया लिहल्या आहेत. पुरूषवर्ग अशा फॅण्टसीज्‌वर  comments करतो कां? माहीत नाही , अंदाजसुद्धा करता येत नाही…. जाणकारांनी अवश्य मार्गदर्शन करावे…..

(मिळालेला धडा – आताच्या मुलांना सांगायच्या गोष्टींची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते….)

 

खाण्याबाबतचे नखरे….

 

बर्‍याच जणांचे खाण्याबाबत बरेच नखरे असतात . म्‍हणजे अमुक भाजी आवडते ,तमुक भाजी पानातसुद्धा पडू देत नाही. कोबी,गवार,शेपू या काय भाज्या आहेत कां?वगैरे वगैरे ….आमच्या घरी भाजी कशी दिसावी याचे फंडे ठरलेले आहेत . सर्वांना झणझणीत तिखट आवडते, त्यामुळे कलर पाहून भाजी खायची कि नाही ते ठरवतात. छान लाल रंग असेल तर भाजी उत्तम झाली असणार नाहीतर आहेच हॉटेल झिंदाबाद!!!

माझ्या नवर्‍याला भाजीबाबत फारसे नखरे नाहीत..त्यामुळे मला सर्वांकडून ऎकावे लागते किप्र‍ज्ञाचं बरं आहे बुवा, भाजी कोणती करावी याची चिंता फारशी चिंता तिला नसते, रवीला काय सगळ्या(!!)भाज्या आवडतात”.पण माझ्या नवर्‍याचा मात्र वेगळाच फंडा आहे. पोळी कशी असावी याबाबत त्याची मते firm आहेत. पोळी कडेपर्यंत व्यवस्थित भाजलेली असावी , ती इतकी लुसलुशीत असावी कि फक्‍त तीन बोटांनी तुटायला हवी… अशा पोळीबरोबर मग भाजी कोणतीही चालते. पण पोळी जर कच्ची असेल तर मात्र चविष्ट भाजी असुनसुद्धा त्याचे जेवण अपूर्ण रहाते. माझी लेक पण बाबांवर गेली आहे . शेपूची भाजी तर तिला अत्यंत प्रिय…. तिला मंड‍ईत घेऊन गेले कि तिचा एकच हट्ट …‘आई शेपू घे नां…’

माझ्या काही मैत्रिंणींचे ऎकते नां घरात रोज तीन तीन भाज्या बनवतातकां तर एकाला वांगी आवडतात तर दुसर्‍याला वांग्याची अ‍ॅलर्जी…तर तिसर्‍याला बटाटयाशिवाय इतर काही चालत नाही.काहीजण म्हणतात कि अमुक भाजी मी आयुष्यात खाल्ली नाही ,खाणार नाही…

एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाण्याबाबतच्या आवडीनिवडी ठीक आहेत. पण परदेशात जिथे घरच्यासारखे खाणे मिळणे कठीण असते, तिथे जे मिळेल ते खावेच लागते… आपल्या देशात अशी बरीच लोकं आहेत ज्यांना एकावेळचे खाणे मुश्किलीने मिळते, त्यांना खाण्याबाबतचे नखरे परवडतच नाहीत….अशांचा विचार आपण जेवताना केला तर समोरची नावडती भाजी पण आनंदाने खाल्ली जाईल. मग ते केवळउदरभरण’ रहातायज्ञकर्म’ हो‍ऊन जाईल……