माझा ब्लॉग सुरू करून सव्वा वर्ष झालं…. वेळेअभावी ( उर्फ प्रतिभेअभावी )फार काही लेख लिहून झाले नाहीयेत… आज मी माझा ब्लॉग पाहिला आणि लक्षात आलं की अरे, आपल्या ब्लॉगला दहा हजाराहून जास्त लोकांनी भेट दिली आहे. तर माझ्या सर्व वाचकांना धन्यवाद देण्यासाठी ही आजची पोस्ट ….तन्वी, महेंद्रकाका, देवेन, सौरभ, हेरंब, हेमंत, सुहास अशा ब्लॉगर्सनी सातत्याने कौतुकाची शाबासकी दिली. याशिवाय कितीतरी अनोळखी वाचकांनी पोस्ट आवडल्याचे आवर्जून सांगितले आणि प्रतिकिया देऊन, पोस्टला सबस्क्रिप्शन देऊन माझा लिहण्याचा उत्साह वाढवला..
सर्वात महत्वाचे आभार ‘मराठी ब्लॉग विश्व’ चे ज्यांनी माझ्यापर्य़ंत १६५९ वाचक (आतापर्यंत) पोचवले आहेत
आणि अर्थात गुगलदादाचे
ज्याचा वापर करून वेगवेगळ्या शब्दांनी शोध घेत वाचक ‘जीवनतरंग’ वर आले. कोणकोणत्या शब्दांनी शोध घेत लोकं या साईटवर पोचले हे पाहिलं तर आश्चर्य वाटतं. कॉम्प्युटर, व्यसन, रंगकाम, सासू, प्रोत्साहन, अल्बम,नेटवर्किंग, हलवा, लग्न विश्वास, मोटीव्हेशन यासारखे शोध घेत येणार्यांना त्यांच्या शोधपूर्तीचे समाधान मिळाले असेल. मात्र ‘ताईला शू आली’ या व अशासारख्या शब्दांची लिंक या साईट्पर्यंत कशी काय पोचते हे मलाच शोधावे लागेल. ( आणि हे वाक्य कशाला कोण सर्च करेल?)असो. तर ‘जीवनतरंग’ ला भेट देणार्या, प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे मनापासून आभार… असाच लोभ ठेवून माझा लिहण्याचा उत्साह वाढ्वाल अशी विनंतीवजा अपेक्षा…..
तशी मी फार बडबडी नाहीय् आणि बोलून मोकळं होणं हे मला फार जमत नाही. मला असं वाटतं की माझे हे गुण (/अवगुण) माझ्या लिखाणातही येतात. त्यामुळे माझ्या सुरवातीच्या काही पोस्ट वाचताना मला असं वाटलं की विषय चांगला आहे पण मी जे काही लिहलंय् ते अजून फुलवता, खुलवता आलं असतं… ब्लॉग लिहण्याचा माझा व्यक्तीगत फायदा असा झाला की विचारात आणि पर्यायाने लिहण्यात अधिक सुसुत्रता येत गेली. आपण जसा विचार करतो तसं आपण लिहतो असं मला वाटतं. माझ्या लिहण्यातून मला समोरच्या व्यक्तीपर्यंत काही मत, विचार, अनुभव, वास्तव, निरीक्षणें पोचवायची असतील तर ते लिखाण समजायला सोपे हवे आणि ते सोपे करण्यासाठी जास्त सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवे. म्हणजेच माझे विचार सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवेत. आणि जसंजसं जास्त लिहू तसतसं विचार करण्याची पद्धतही परिपक्व होत जाते असं माझ्या लक्षात आलंय्. अर्थात विचार करण्याची योग्य पद्धत आणि योग्य विचार यांत बरेच अंतर आहे. मात्र योग्य विचारांपर्यंत पोचण्याची ही पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. लिहण्यातला आनंद घ्यायला मी शिकतेय्. So Happy Writing to myself…
वाह वाह… हाबिणंदण !!
काल हापिसात बसून पुर्ण ब्लॉग वाचला होता, प्रतिक्रियांवरून कळले असेलंच आपल्याला.. ब्लॉगवर कोण कसं पोचेल सांगता येत नाही, माझ्या ब्लॉगवर प्रणयकथा, शिव्या, शाप असे शब्द सर्च करून लोकं कसे पोचतात, याचा शोध घेतोय
असो, लिहिते रहा !!
कमेंटस् मध्ये एकदम ८ नवीन कमेंटस् पाहून मी तर आश्चर्यचकीतच झाले होते….
धन्यवाद सुहास …
मनापासून अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा … अशीच नवी नवी शिखरे पादाक्रांत करावीत ही सदिच्छा…लिहिते रहा…
धन्यवाद देवेन…
शिखर खूप लांब आहे, ही तर छोटीशी टेकडी आहे…लिहित रहाणे हे महत्वाचे….
अभिनंदन!! लिहित रहा, जे काही मनात येईल ते लिहित रहा, पुन्हा एकदा अभिनंदन!
धन्यवाद काका…. मनात तर खूप विचार येत असतात, छान विषय डोक्यात घोळत असतात पण ते शब्दबद्ध करायला अजून तितकेसे जमत नाहीय्…. प्रयत्न चालूच ठेवणार आहे…