मासिक संग्रह: ऑक्टोबर 2010
रिक्षा/व्हॅन वाले काका
माझी शाळा घरापासून बर्यापैकी जवळ होती. त्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणी मिळून चालत शाळेला जायचो. तेव्हाही रिक्षामधून शाळेला येणार्यांबद्द्ल कुतुहल असायचे. स्कूल बस हा प्रकार काही निवडक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून उपलब्ध असायचा.
आता शाळा घरापासून लांब किंवा जवळ असली तरी बहुतेक सर्व मुले रिक्षा, व्हॅन किंवा स्कूलबसमधून शाळेला जात असतात. या मुलांचा एक ग्रुप तयार झालेला असतो. वेळेअभावी श्रृतीला मी रोज शाळेत नेऊ-आणू शकत नाही म्हणून या वर्षी व्हॅन लावली आहे. व्हॅन / रिक्षावाल्या काकांबरोबर या मुलांचं एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. आज आईनं डब्यात काय दिलंय इथपासून टीचर, स्कूलमधले फ्रेंडस् काय म्हणाले इथपर्यंत या काकांबरोबर गप्पा होत असतात. प्रत्येक वर्षी स्कूलच्या शेवटच्या दिवशी या काकांकडून त्यांच्या रिक्षा / व्हॅन मधल्या सर्व मुलांना छोटीशी गिफ्ट व मुलांचा आवडता खाऊ (कुरकुरे, कॅडबरी) वगैरे असतो. तिचे ‘व्हॅनकाका’ रोज सकाळी गणपतिस्त्रोत्र, हनुमानस्त्रोत्र, रामरक्षा अशा कॅसेटस् लावत असतात. मी त्यांना म्हंट्लं, “काका, तुम्ही व्हॅनमध्ये स्त्रोत्रं , श्लोक वगैरे लावता ते खूप छान वाटतं. त्यानिमित्ताने मुलांची सकाळ प्रसन्न होते.” ते म्हणाले, “हो तर. ऎकून ऎकून मुलांचे श्लोक पाठ होतात. मी गाडीत FM वगैरे कधीच लावत नाही.”
प्रोत्साहन (अर्थात Motivation)
मला सुरवात ‘अ आ इ ’ पासून करायची होती. कारण Microsoft Exchange Server 2007 हे नांव ऎकून होते पण त्याचं installation किंवा administration कधीही केले नव्हते, किंवा याच्याशी संबधित पुस्तकंसुध्दा आमच्याकडे नव्हती. आणि महत्वाचे म्हणजे आमच्याकडे Exchange Server 2007 चा setup नव्हता. मग गूगलदादांच्या मदतीनं आधी installation कसे करायचे याची माहीती मिळवली. जी माहिती मिळली त्यातून असे कळाले की server operating system , domain controller , IIS server , .net framework 3.0 अशा एकूण १० बेसिक गोष्टी होत्या की ज्या आधी install कराव्या लागणार होत्या. मगच Microsoft Exchange Server 2007 चे installation होऊ शकत होते. मी या सगळ्या गोष्टींच्या requirment चे एक proposal सरांना सादर केले आणि ‘माझ्या कोर्टातला बॉल ऑफिसच्या कोर्टात’ ढकलला. आता मला setup मिळाला की काम पुढे चालू होणार…. चला मी सुटले…..